महत्वाच्या बातम्या

 बीज भांडवल योजनेचा मातंग समाजातील उमेदवारांनी लाभ घ्यावा


- सात लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयातील मातंग समाजातील बारा पोट जातीतील अर्जदारांना स्वयंरोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्याकरिता व समजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरिता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली असून त्या अंतर्गत मातंग समाजातील बारा पोट जातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. चालू आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेंतर्गत ५० हजार ते ७ लाखपर्यंत जिल्हयाला ५० कर्ज प्रकरणाचे उद्दिस्ट प्राप्त झाले असून बीज भांडवल योजनेचा मातंग समाजातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे  

या योजनामध्ये महामंडळाचा सहभाग (अनुदानासह ४५ टक्के ) लाभार्थी सहभाग ५ टक्के तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग ५० टक्के असतो महामंडळाच्या बीजभांडवल रकमेवर ४ टक्के व्याज दर आकारण्यात येतो व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याज दर असतो. अनुदान योजने अंतर्गत रुपये ५ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. या योजनेचे ७५ कर्ज प्रकरणाचे उद्दिस्ट प्राप्त झाले आहे.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील असावा, वयोमर्यादा १८ ते ५० असावी, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड आधार कार्ड, घर कर पावती, कोटेशन, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल इ. आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआयकॉलेज समोर बी विंग रूम नं.३०२, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन कर्ज प्रस्ताव सादर करावे.





  Print






News - Nagpur




Related Photos