महत्वाच्या बातम्या

 महिला समुपदेशन केंद्रासाठी संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महिला व बालकावर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी महिला समुपदेशन करणे, त्यांना संरक्षण व मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. ईच्छुक संस्थांनी समुपदेशन केंद्राचे प्रस्ताव तीन प्रतीत १४ जुलैपर्यंत सादर करावे.

प्रस्ताव पोलीस स्टेशन उमरेड तालुका उमरेड येथील केंद्राकरीता मागविण्यात येत असून योजनेअंतर्गत महिला समुपदेशन केंद्र मान्यता प्रस्ताव अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणी आवश्यक. नोंदणीकृत संस्था महिला व बाल विकास क्षेत्रात किमान तीन वर्षे कार्यरत असावी, अहर्ता असणाच्या पात्र इच्छुक संस्थांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक, विहित नमुना अर्ज, संस्थेची संक्षिप्त माहिती, संस्थेच्या योजना व कार्याबाबतचा मागील तीन वर्षाचा वर्षनिहाय वार्षिक अहवाल, संस्थेचा मागील तीन वर्षांचा सनदी लेखापालाची स्वाक्षरी असलेला वर्षनिहाय लेखा परीक्षण अहवाल, संस्थेने समुपदेशनाचे कार्य केल्याबाबतचा कार्याचा स्वतंत्र अहवाल, सांख्यिकी माहिती, संस्थेचे मागील तीन महिण्याचे बँक स्टेटमेंट, संस्थेची घटना व नियमावलीची (घटनेत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा) साक्षांकित प्रत जोडावी. अधिक माहितीकरीता महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos