डॅा. जरीना कुरेशी राहणार आंतरराष्ट्रीय संमेलनाला उपस्थित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पाच जुलै या शिक्षकदिनी भारत नेपाळ सांस्कृतिक संमेलन कार्यक्रमाला नवेगाव खैरी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जरीना कुरेशी या उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात जगभरातील ३०० शिक्षक उपस्थित राहणार आहे. नेपाळ, भुटान, अफगाणिस्तान, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, फिनलंड, जर्मनी, इराक, इस्त्रायल आदी २२ देशातील शिक्षक सहभागी होणार आहेत. नेपाळचे उपराष्ट्रपती या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
News - Nagpur