महत्वाच्या बातम्या

 धान खरेदीसाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आधारभुत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये शासन निर्णयानुसार धान खरेदी करण्याकरिता १० जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी नोंदणी झालेल्या सर्व शेतकन्यांनी धान खरेदी केंद्रावर आपले धान विक्रीस न्यावे व आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सबएजेंट संस्थांनी वाढीव मुदतीत धान खरेदीपासून शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. धान खरेदीपासून शेतकरी वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची राहील, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.एस.पाटील यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos