बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी रमेश गजबे यांना उमेदवारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी रमेश गजबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे . मात्र, या यादीमध्ये भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. 
 ३७ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. 
 बौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

 
 बहुजन वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी 

 धनराज वंजारी -  वर्धा
 किरण रोडगे -   रामटेक
 एन.के.नान्हे –   भडांरा-गोंदिया
 रमेश गजबे -    गडचिरोली(चिमूर)
 राजेंद्र महाडोळे-  चंद्रपूर
 प्रवीण पवार -   यवतमाळ(वाशीम)
 बळीराम सिरस्कार -  बुलढाणा
 गुवणंत देवपारे-   अमरावती
 मोहन राठोड-  हिंगोली
 यशपाल भिंगे- नांदेड
 आलमगीर खान अखिल मोहम्मद खान- परभणी
 विष्णू जाधव-  बीड
 अर्जुन सलगर-  उस्मानाबाद
 राम गारकर-   लातूर
 अजंली बावीस्कर-   जळगाव
 नितीन कांडेलकर-  रावेर
 शरदचंद्र वानखेडे-  जालना
 सुमन कोळी- रायगड
 अनिल जाधव-  पुणे
 नवनाथ पडळकर-  बारामती
 विजय मोरे-  माढा
 जयसिंग शेंडगे-  सांगली
 सहदेव एवळे- सातारा
 मारूती जोशी- (रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
 अरूणा माळी-  कोल्हापूर
 अस्लम बादशाहजी सय्यद-  हाताकंगले
 दाजमल गजमल मोरे- नंदुरबार
 बापू बर्डे-   दिंडोरी
 पवन पवार-  नाशिक
 सुरेश पडवी-  पालघर
 ए.डी.सावंत-  भिवंडी
 मल्लिकार्जुन पूजारी-  ठाणे
 अनिल कुमार-  मुंबई साउथ दक्षिण
 संजय भोसले-  मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
 संभाजी शिवाजी काशीद-  ईशान्य मुंबई
 राजाराम पाटील-  मावळ
 अरूण साबळे-  शिर्डी



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-03-15






Related Photos