कुलर वापरताय , मग खबरदारी घ्या


-  महावितरणचे नागरिकांना आवाहन
-  कुलरपासून बालकांना दूर ठेवा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून नागरिकांनी अडगळीत टाकलेले कुलर बाहेर काढून दुरुस्ती सुरु केली आहे. कुलर लावताना अनेक अपघात होत असतात. दरवर्षी अनेकांचा जीव गेला आहे. यामुळे महावितरण ने कुलर लावताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 
उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाडयामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला असून कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघातटाळणे गरजेचे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे.
उन्हाळयात शॉक  लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेजसर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संमपताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अर्थिंग नीट असल्यास वीज उपकरणांच्या वापराच्या प्रमाणातच जळते व ती जमीनीत   जास्त न गळता   वीज वापरा चे चक्र पूर्ण करत सुरक्षितता प्रदान करते. त्यामुळे अर्थिंग व्यवस्थित असने अतिशय महत्वाचे आहे.
कुलरच्या लोखंडी बाह्य भागात वीज पुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. पाणी भरतांना कुलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा.कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श  करू नये. ओल्या हाताने  किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये,पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. त्यानंतर प्लग काढल्यानंतर व पंपाला हात लावला. पंप पाण्यात बुडला नसल्याची  खात्री करून घ्यावी.बरेचदा पाण्याची पातही खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअर लाॅक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा अज्ञानामुळे चालूपंपाचे प्रायमिंग केले जाते. अशावेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालु पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे,असे आवाहन महावितरण ने केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos