महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर येथील उपकेंद्रासाठी जागा मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) महाविद्यालय जवळील नझूल मोहल्ला बाबूपेठ ता. जि.चंद्रपूर येथिल आराजी ३४,५४६.२७ चौ. मी.(साडे आठ एकर जागा) इतके क्षेत्र उपकेंद्र सुरू करण्यासाठी सदर जमीन मंजूर केली आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय .

चंद्रपूर जिल्हयामध्ये चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभिड, ब्रम्हपूरी, सावली, सिंदेवाही, मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर, कोरपना, जिवती, राजुरा, गोंडपिपरी या १५ तालुक्यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये विविध प्रकारची विपुल खनिज संपत्ती असून दगडी कोळसा, लोखंड, चुनखडी यांचे फार मोठे साठे आहेत. तसेच जिल्हा वनसंपदेनी व्यापलेला असून तेंदुपत्ता, बांबु, डिंक इ. वनउपज मोठया प्रमाणात आहेत. येथे सिमेंट कारखाने, कागद, पोलाद, मॅगनिज, रेफ्रिजरेटर निर्माण करण्याचे कारखाने आहेत.

चंद्रपूर जिल्हयातील १३३ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नीत त्यामध्ये ४४ महाविद्यालये अनुदानीत व ८९ महाविद्यालये विना अनुदानीत आहेत. चंद्रपूर जिल्हयातील १३३ महाविद्यालयातून ७१,११९ विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातून शिक्षण घेत आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात कारखाने असल्यामूळे येथील विद्यार्थ्यासाठी कौशल्य विकासावर आधरित अभ्यासक्रम विद्यापीठाव्दारे उपकेंद्रात सुरू करणे सोयीचे होईल व त्यामुळे युवकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकतात.

चंद्रपूर जिल्हयातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे कामकाज सोईचे होण्याकरिता तसेच त्यांचा वेळ व पैसा वाचविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळेवर निकाली काढण्यासाठी चंद्रपूर येथे विद्यापीठ उपकेंद्राची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे सदर उपकेंद्रासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे.


काय राहील उपकेंद्रात : 

चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) महाविद्यालय जवळील नझूल मोहल्ला बाबूपेठ ता. जि. चंद्रपूर येथिल आराजी ३४,५४६.२७ चौ.मी (साडे आठ एकर जागा) इतके क्षेत्र उपकेंद्र सुरू करण्यासाठी सदर जमीन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांनी मंजूर केली आहे. 


सदर जागेमध्ये

• उपकेंद्राची प्रशासकीय इमारत

• शैक्षणिक ईमारत व वर्ग खोली

• क्रिडा केंद्र

• विद्यार्थी सहाय्यता विभाग

• कौशल्य विकास केंद्र

• परिक्षा मूल्यांकन केंद्र

• वसतीगृह

•  १०० आसन क्षमता सांस्कृतिक सभागृह

• खुले रंगमंच

इ.ची निर्मीती करण्यात येईल. 


कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम : 

सदर उपकेंद्रात चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक व औद्योगिकरण लक्षात घेता मोठया प्रमाणावर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अश्या पद्धतीने अभ्यासक्रम चालविण्यात येतील. यामध्ये व्यावसायिक व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश राहील.


ग्रंथालय : 

चंद्रपूर येथे निर्माण होणाऱ्या उपकेंद्रामध्ये सुसज्य असे आधुनिक ग्रंथालय उभारण्यात येईल. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घेणे सोईचे होईल. ग्रंथालयात ऑनलाईन सुविधा, ई जर्नल, इनफ्लिबनेट इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठाचे चंद्रपूर येथील उपकेंद्रामध्ये चंद्रपूर जिल्हयातील संलग्नीत महाविद्यालये व विद्यार्थ्यांची परिक्षा संदर्भातील कामे पुर्णतः या उपकेंद्रामधून चालविण्यात येतील. त्यामुळे अधिका-अधिक विद्यार्थी विद्यापीठाकडे आकृष्ठ होऊन त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. या उपकेंद्रांसाठी जागा मंजूर होण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना विद्यापीठाची चमू तसेच विद्यापीठाचे अभियंता जितेंद्र अंबागडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos