महत्वाच्या बातम्या

 कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी समिती अनिवार्य


- ५० हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी, आस्थापना मालकांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे अनिवार्य आहे.

सदर समिती गठीत करण्याबाबत माहिती सादर करण्यास दिरंगाई झाल्यास अधिनियमातील नियमाप्रमाणे सदर आस्थापना ५० हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहील. जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार व कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापना मालकांनी https://ee.humanitarianresponse.Info/x/mcRhfeTy या लिंकवर आस्थापनेची माहिती भरून घ्यावी. सदर लिंकमध्ये सबमिट केलेली माहिती चंद्रपूर, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या assttcommrchd@gmail.com या ई-मेल आयडीवर कळवावे. माहिती भरतांना काही अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त एम.पी. मडावी यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos