महत्वाच्या बातम्या

 भद्रावती पोलीस स्टेशन येथील भंगार वाहनाच्या लिलावाकरीता निविदा आंमत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन, भद्रावती येथे बऱ्याच कालावधीपासून जमा असलेली जंगम मालमत्ता उपविभागीय दंडाधिकारी, वरोरा यांच्या आदेशान्वये भंगारमध्ये काढण्यात येत आहे. सदर वाहनाबाबत कोणीही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस स्टेशन, भद्रावती येथे हजर न झाल्याने एकूण 31 मोटर सायकलचा लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांची शासकीय किंमत रु. 42 हजार 300 रुपये नमूद असून सदर वाहने टेंडरद्वारे जिथे आहे तिथे, वाहनाचे इंजिन नंबर व चेचिस नंबर मिटवून व वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करावयाची आहे, त्याकरीता इच्छुक खरेदीदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहे. सदर वाहनांचा लिलाव 20 मे 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन, भद्रावतीच्या प्रांगणात होणार आहे.


लिलावाच्या अटी व शर्ती : नमूद जंगम मालमत्ता जशी आहे तशी, जिथे आहे तिथे, ज्या स्थितीत आहे तशी, विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाबाबत तपशीलवार अटी व शर्ती वाचून दाखवण्यात येतील. विक्री रकमेच्या 10 टक्के अनामत रकमेचा भरणा केल्यावर लिलाव बोली बोलून झाल्यानंतर ज्याच्या नावाने सदर वाहनांचा लिलाव मंजूर होईल, त्या खरेदीदारास उर्वरित रकमेचा भरणा त्वरित लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल.


वाहनाचे इंजिन व चेचीस नंबर मिटवून व तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. जे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहे. ज्याच्या नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे, तेच विक्री रकमेच्या 10 टक्के अनामत रकमेचा भरणा करतील व त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावामध्ये प्रवेश मिळणार आहे. अनामत रकमेचा भरणा करताना त्यांचे प्रमाणपत्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी लागेल. सदर लिलावाच्या बोली, ऑफर स्वीकारणे, न स्वीकारणे, लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता निर्णय घेणे हे सर्व अधिकार पोलीस स्टेशन भद्रावतीचे पोलीस निरीक्षक यांना राहतील, याची नोंद घ्यावी.





  Print






News - Chandrapur




Related Photos