महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


६ एप्रिल महत्वाच्या घटना

१६५६ : शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून टायगड किल्ला ताब्यात घेतला.

१८९६ : आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरुवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.

१९१७ : पहिले महायुद्ध अमेरिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

१९३० : प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

१९६५ : व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला

१९६६ : भारतीय जलतरणपटू मिहींद सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पाट केली.

१९८० : भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटल बिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.

१९९८ : भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

१९९८ : स्तनांचा कर्करोग बटा करणाऱ्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.

२००० : मीट या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीटला भेटले.

६ एप्रिल जन्म

१७७३ : स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म. (मृत्यू : २३ जून १८३६)

१८८४ : ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू : २३ जानेवारी १९३४)

१८९० : फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म. (मृत्यू : २३ डिसेंबर १९३९)

१८९० : उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म. (मृत्यू : ९ सप्टेंबर १९६०)

१८९२ : डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माति डोनाल्ड विल्स डग्लस यांकह जन्म. (मृत्यू : १ फेब्रुवारी १९८१) 

१९०९ : भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म. (मृत्यू : २२सप्टेंबर १९९४)

१९१७ : मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. (मृत्यू : १८ नोव्हेंबर २००६)

१९१९ : कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.

१९२७ : उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही.एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म. (मृत्यू : २८ जून २०००)

१९२८ : फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल

पारितोषिक विजेते जेवरसायनशास्त्रज जेम्स वॉटसन यांचा जन्म. 

१९३१ : बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म. (मृत्यू : १७ जानेवारी २०१४-कोलकता, पश्चिम बंगाल)

१९५६ : क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.

६ एप्रिल मृत्यू

११९९ : इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म : ८ सप्टेंबर ११५७)

१९५५ : धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन. 

१९८१ : मानवधर्माचि उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन.

१९८३ : भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन. (जन्म : १० जून १९०८)

१९८९ : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन. (जन्म : ७ मे १९१२ मांडली, डुंगरपूर, राजस्थान)

१९९२ : अमेरिकन जीवरसायनशास्त्रज आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन. (जन्म : २ जानेवारी १९२०)





  Print






News - todayspecialdays




Related Photos