व्ही व्ही पॅटमुळे संभ्रम दूर होऊन निवडणूक पारदर्शी होईल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
व्ही.व्ही.पॅट मुळे आता मतदारांच्या मनात असलेला संभ्रम पूर्ण दूर होईल आणि संपूर्ण पारदर्शीपणाने निवडणूक होईल असे प्रतिपादान पालकमंत्री ना.  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले.
 नियोजना समिती सभागृहात जिल्हा विकास समिती आढाव्यानंतर आयोजित व्ही.व्ही.पॅट प्रात्यक्षिकाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. त्यांनी स्वत:मत नोंदवून प्रत्यक्षात दिलेल्या क्रमांकाची पावती कशी प्राप्त होते हे पहिले . यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर तसेच आमदार डॉ. देवराव होळी यांनी देखील मतदान करुन या यंत्राच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.सचीन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार सुनिल चटगुलवार  आदींची प्रमुख उपस्थिती होती.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-25


Related Photos