अहेरी उपविभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
  अहेरी व परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे क्षतीग्रस्त झालेल्या भागांची भर पावसात  पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पाहणी केली. 
मागच्या १५ - २० वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वरूण राजाचा प्रकोप झालेला नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भर पावसात पुरपरिस्थिच्या  संदर्भात तातडीने घेतलेल्या आढावा बैठकीनंतर अहेरी तहसील  कार्यालयातून थेट नुकसानग्रस्त  भागाचा आढावा घेण्याकरिता पालकमंत्री ना. आत्राम  निघाले. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? हे कळावे, यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, तहसीलदार  प्रशांत घोरुडे, उपविभागीय अधिकारी (सिंचाई) हिंगोले सह इतर प्रशासकीय अधिकारी तसेच बहुसंख्येने असलेले भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी  पुरजन्य परिस्थितीचा आढावा घेतला. 
  त्याचप्रमाणे अहेरी भागात असलेले तलाव मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरण्याच्या स्थितीत आले  आहेत.  आणखी पाऊस झाल्यास तलाव फुटण्याची शक्यता आहे.   त्यामुळे तलाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे. याच परिस्थितीला  ओळखून पालकमंत्र्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला पाचारण केले व परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करण्यासंबंधी आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-21


Related Photos