अकरा लाखाच्या खंडणीसाठी शिर्डीतील मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
अकरा लाखाच्या खंडणीसाठी शिर्डीतील मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब नामदेव सोनवणे रा.पळस खेडा  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
शहरात कर्डोबा नगर या भागात राहणारी महिला सुनंदा भाऊसाहेब गरुड हिने  मुलगा आर्यन (८) याचे अपहरण झाल्याची तक्रार केली. ११ लाख रुपये मला दे व तुझ्या ओळखीच्या मुलीबरोबर लग्न लावून दे असे सांगून आरोपीने मुलाचे अपहरण  केले . पैसे दे नाहीतर तुझ्या मुलाच्या किडन्या काढून विकून टाकीन असा दम देत असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये बाळासाहेब सोनवणे याच्या विरोधात दिल्या नंतर भा.द.वि. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. शिर्डी व देवगाव रंगारी पोलिसांच्या कारवाईत  आरोपीकडून मुलाला ताब्यात घेऊन आईच्या ताब्यात देण्यात आले.
  आठ वर्षाचा मुलगा आर्यन हा आरोपी बाळासाहेब सोनवणे यांचा ताब्यात आहे. तो पळसखेडे या गावात एका घरात असल्याचे मोबाईल लोकेशन वरून निष्पन्न झाले. पो.नि.अरविंद माने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरिक्षक मोहन बोरसे यांना तपासाचे आदेश दिले. गुन्हेशाखेचे पोहेकाॅ  प्रसाद साळवे,पोना बाबासाहेब सातपुते,पोना अजय अंधारे,मोबाईल सेलचे गोकुळ पळसे व देवगाव रंगारी येथील महिला पोलीस अधिकारी ए.एस.शहापुरकर,पोलीस कर्मचारी किसन श्रीखंडे, विजय धुमाळ यांनी पळस खेडे गावात जाऊन सापळा लावून ह्या मुलाच्या आईची मदत घेऊन अपहरण करणाऱ्या बाळासाहेब सोनवणे याला ताब्यात घेतले. ज्या घरात हा मुलगा ठेवला होता तेथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले. अपहरण करणारा बाळासाहेब सोनवणे याला अटक करण्यात आली असून या अगोदर काही गुन्हे केले आहे का त्याचा गुन्हेगारी इतिहास आहे का याची माहिती शिर्डी व औरंगाबाद पोलिसांकडून घेतली जाणार आहे. शिर्डी पोलिसांची महिण्याभरात हि पाचवी मोठी कामगिरी आहे
   Print


News - Rajy | Posted : 2018-12-07


Related Photos