महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना (२२ फेब्रुवारी)

२२ फेब्रुवारी १८१९ : स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

२२ फेब्रुवारी १९४२ : दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

२२ फेब्रुवारी १९४८ : झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

२२ फेब्रुवारी १९५८ : इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

२२ फेब्रुवारी १९७८ : श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२२ फेब्रुवारी १९७९ : सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

जन्म (२२ फेब्रुवारी)

२२ फेब्रुवारी १७३२ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)

२२ फेब्रुवारी १८३६ : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)

२२ फेब्रुवारी १८५७ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १८९४)

२२ फेब्रुवारी १८५७ : बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)

२२ फेब्रुवारी १९०२ : जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)

२२ फेब्रुवारी १९२० : चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)

२२ फेब्रुवारी १९२२ : व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

२२ फेब्रुवारी १९६४ : मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

२२ फेब्रुवारी १९७५ : अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म

मृत्यू (२२ फेब्रुवारी)

२२ फेब्रुवारी १९१५ : हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)

२२ फेब्रुवारी १८२७ : चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)

२२ फेब्रुवारी १९२५ : ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ - ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

२२ फेब्रुवारी १९४४ : कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)

२२ फेब्रुवारी १९५८ : स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

२२ फेब्रुवारी १९८२ : ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)

२२ फेब्रुवारी २००० : लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

२२ फेब्रुवारी २००० : प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)

२२ फेब्रुवारी २००९ : लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos