महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर शहरात आवश्यक ठिकाणी गतिरोधक बनविण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग महामार्गाची निर्मिती झाल्यापासून लोकांची वर्दळीसह वाहनांची गतीही वाढली आहे. या भरधाव वाहनांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यात कोणाचे जीव ही गेले आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. सदर अपघात टाळण्यासाठी शहरातील योग्य ठिकाणी गतिरोधक बनविण्यात यावे, अशी मागणी एक पत्रक द्वारे माजी युवा सेना समन्यक गौरव नाडमवार यांनी केले आहेत. शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग महामार्ग मधून आलापल्ली तसेच तेलंगाना कडे जाणाऱ्या वाहतूक याच मार्गातून जात असते.त्यामुळे शहरात वाहनांची चहलपहल जास्त असते. तसेच शहरात दोन चाकी वाहने जास्त प्रमाणात आहे. त्यांचे वेग मर्यादित नसतात.

बल्लारपूर शहर दोन भागात विभागले असून शहराच्या मध्य भागातून राज्यमार्ग महामार्ग आहे. शहरातून मुख्य मार्ग असल्याने कलामंदिर, पेपर मिल गेट, काटा गेट फुटकी दीवार, सुभाष टॉकीज, रेल्वे चौक, जुना बस स्टँड परिसर, वन विभाग गेट, बीटीएस परिसर मध्ये गतिरोधक बनविण्यात यावे. रेल्वे चौक, सुभाष टॉकीज चौकात सर्वाधिक लहान मोठे अपघात घडून येत असल्याने तत्काळ गतिरोधकची निर्मिती झाल्यास अपघातवार नियंत्रण मिळवता येईल, असे गौरव नाडमवार यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos