भरधाव बसने महिलेला चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / औरंगाबाद :
स्थानिक सिडको बस स्टँड चौकाकडून मुकुंदवाडीकडे वळत असताना मागून भरधाव येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने एका महिलेला चिरडले.  मोहिनी प्रितेश कुलकर्णी (२४ ) असे मृत महिलेचे नाव आहे. 
 मृतक महिला दुपारी  मोपेडने एपीआय कॉनरचौकातील रुग्णालयात जात होत्या. सिडको उड्डाणपूलाखाली त्या असताना मागून सुसाट वळण घेत मुकुंदवाडीकडे निघालेल्या एसटी बसने त्याना जोराची धडक दिली. या घटनेत मोहिनी या बसच्या पुढील आणि मागच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळीच त्यांचाय मृत्यू झाला. अपघातनंतर बसचालक बससह पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून मुकुंदवाडी ठाण्यालगत बस पकडली. तसेच एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 



  Print






News - Rajy | Posted : 2018-11-03






Related Photos