महत्वाच्या बातम्या

 आकाशाला गवसणी घालण्यासाठी आत्मनिर्भर बना : बँक ऑफ इंडिया आंचलिक प्रबंधक एस. संथोष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ब्युटीपार्लर व्यवस्थापन हि एक कलाकारी असून यात आकाशाला गवसणी घालण्याईतपत वाव उपल्बध आहे आणि ही संधी आरसेटीने आपल्याला दिलेली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी स्वतः आत्मनिर्भर बना असा संदेश बँक ऑफ इंडियाचे नागपूर विभागाचे आंचलीक प्रबंधक एस संथोष यांनी दिला. ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा  संचालीत ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी ) गडचिरोली येथे आज जन मेळावा कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी अग्रणी जिल्हा प्रबंधक युवराज टेंभूर्णे, बँक आफ इंडियाचे वरीष्ठ प्रबंधक उदय काकपूरे आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर तसेच ब्यूटी पार्लर व्यवस्थापन च्या प्रशिक्षणार्थी व मार्गदर्शिका तृप्ती खरवडे उपस्थित होते .

या कार्यक्रमा दरम्यान प्रशिक्षणार्थी कु प्रतिक्षा रामटेके., स्वाती वाडगुरे, व अशविनी राऊत यांनी प्रशिक्षणातील विषयांचा मागोवा घेतला . 

अग्रणी जिल्हा प्रबंधक युवराज टेंभूर्णे यांनी सामाजिक सुरक्षा योजनेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आणि या योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन ही केले  . वरीष्ठ प्रबंधक उदय काकपूरे यांनी वित्तीय सहाय्यता याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदशनि हेमंत मेश्राम यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालयीन सहाय्यक अमित व पराग व घननील मेश्राम यांचे सहकार्य लाभले. 






  Print






News - Gadchiroli




Related Photos