भाजपा चामोर्शी तालुक्याची मासिक बैठक उत्साहात संपन्न


- तिरंगा यात्रा, हर घर तिरंगा, मन की बात आणि विभाजन विभीषिका स्मृती दिन कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा चामोर्शी तालुक्याची मासिक बैठक चामोर्शी येथील आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र.२ जनसंपर्क कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली तर चामोर्शी तालुका प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीत आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रा, हर घर तिरंगा अभियान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण तसेच विभाजन विभीषिका स्मृती दिन निमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, बूथस्तरावरील संघटना अधिक मजबूत करणे आणि जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करताना इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजाशी सातत्याने जोडलेला राहून केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करावा. आगामी सर्व संघटनात्मक उपक्रम, बूथ सक्षमीकरण, BLO सोबत SIR चे काम पूर्ण करणे आणि जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले
पुढे बोलताना हर घर तिरंगा, तिरंगा यात्रा, मन की बात आणि विभाजन विभीषिका स्मृती दिन हे उपक्रम प्रत्येक गावात आणि प्रत्येक बूथवर प्रभावीपणे राबविणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. संघटन विस्तार, जनसंपर्क आणि राष्ट्रहिताच्या विचारांचा प्रचार करत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांनी सुद्धा अध्यक्षीय मार्गदर्शन केले.यावेळी संघटनात्मक जबाबदाऱ्या, सदस्य नोंदणी, बूथ सक्षमीकरण, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
बैठकीला तालुका अध्यक्षा श्रीमती रोशनीताई वरघंटे,जिल्हा उपाध्यक्ष दिलीपजी चलाख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, तालुका महामंत्री संजय खेडेकर, तालुका उपाध्यक्ष राजुभाऊ चुधरी,महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कविताताई किरमे, माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पाताई रॉय तसेच भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




