महत्वाच्या बातम्या

 कारगिल शहीदांना सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये मानवंदना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत सैनिक स्कूल चंद्रपूर येथे रविवारी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य कॅप्टन (भारतीय नौदल) अश्विन अनुपदेव, उपप्राचार्य लेफ्टनंट कर्नल रुबी दीक्षित, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर रजत जी, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि सर्व कॅडेट्स उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील बॅटल ऑनर मेमोरियल येथे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव यांनी पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कॅडेट्सनी औपचारिक मानवंदना देत देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांप्रती आदर व्यक्त केलायावेळी कारगिल युद्धातील शौर्यगाथांचा आढावा घेत भारतीय सशस्त्र दलांच्या धैर्य, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करण्यात आला.कॅडेट्सना राष्ट्रप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव ही मूल्ये अंगीकारून देशसेवेसाठी स्वतःला सदैव तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या घोषणांनी आणि शहीदांविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेला.





  Print






News - Chandrapur




Related Photos