कोठारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवींद्र झाडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश


- आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : कोठारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि मुलचेरा तालुका काँग्रेस पक्षाचे रवींद्र झाडे यांनी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून आज डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत अहेरी राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून झाडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हार्दिक स्वागत केले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात झाडे यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण मुक्कावार, अनिल बुरमवार आणि विनोद कन्नाके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी झाडे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रवींद्र झाडे यांच्या या पक्षप्रवेशामुळे कोठारी ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली असून, पक्षाचे संघटन गावपातळीवर अधिक मजबूत झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




