महिला सक्षमीकरणासाठी शेतकरी महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा : योगिता पिपरे


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवा कृषी माऊली सोहळा उत्साहात; शेतकरी महिलांना शेती उपयोगी साहित्य किटचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवा कृषी माऊली सोहळा महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), एमआयडीसी रोड, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शेतकरी महिलांना शेती उपयोगी साहित्य किटचे वितरण करण्यात आले तसेच महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती आणि शासनाच्या विविध कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात शेतकरी महिलांना मार्गदर्शन करताना भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) योगिता पिपरे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिला या शेती क्षेत्राचा कणा असून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेत आधुनिक शेती, बचत गट, कृषीपूरक उद्योग आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. महिला सशक्त झाल्यास कुटुंबासह ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी राज्य शासन शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगितले. महिला शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन आधुनिक शेती पद्धती स्वीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि शेती क्षेत्र अधिक सक्षम व प्रगतिशील बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अर्पण करण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, माजी आमदार नामदेवरावजी उसेंडी तसेच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरण आणि कृषी विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक तथा माजी सभापती, नगर परिषद गडचिरोली प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा प्रदेश सदस्या डॉ. चंदा कोडवते, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, कविता उरकुडे, लक्ष्मी कलंत्री, गीता कुळमेथे, स्वाती चंदनखेडे, नगरसेविका शिल्पा गव्हारे, कोमल नैताम, साक्षी बोलुवार, भूषणा खेडेकर, राणी बोशेट्टीवार, भूमिका बरडे, नगरसेविका भारती खोब्रागडे, जिल्हास्तरीय पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, विविध मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अध्यक्षा सीमा कन्नमवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.
News - Gadchiroli




Petrol Price




