महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व नागरिकांना तातडीचा दिलासा द्यावा, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दामोधर नन्नावार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी बांधव व नागरिकांनी, सिंदेवाही तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार, सिंदेवाही यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने तालुक्यातील तलाव, बोड्या, नद्या व नाले आटले असून शेतजमिनींना भेगा पडल्या आहेत. बहुतांश शेतकरी धान पिकावर अवलंबून असून रोवणी केलेली धानाची रोपे पाण्याअभावी सुकत आहेत. अनेक ठिकाणी अद्याप रोवणीही होऊ शकलेली नसल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर सिंदेवाही तालुक्यासह चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे, दुबार पेरणीसाठी विशेष आर्थिक मदत देणे, पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने वितरित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जपुनर्गठनाचा लाभ देणे, धानपिकावर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधव कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत आहे. धानपिकाला ३५०० ते ४००० रुपये इतका हमीभाव देण्यात यावा, डिजिटल (स्मार्ट) वीज मीटर बसविण्याची सक्ती थांबविणे, शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करणे, खराब रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था, बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मिती, शासकीय आरोग्य सेवा सक्षम करणे तसेच प्रलंबित विकासकामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने या मागण्यांचा तातडीने सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सिंदेवाही तालुक्याच्या वतीने करण्यात आली.

या प्रसंगी या प्रसंगी चंद्रभूषण जैस्वाल, प्रकाश बन्सोड, राजू वानखेडे, नागराज मेश्राम, ज्ञानेश्वर हांडेकर, आरिफ शेख, विजय जांभुळे, स्वप्नील कारमेंघे, सलीम पठाण, सुमेश नागदेवते, जगदीश मेश्राम, मनोज गरमळे, अजय लोणबले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos