महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा वर्धा जिल्ह्यावर दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वर्धा येथे व राखीव.

१२१ जुलै रोजी सकाळी ९ नवोदय विद्यालय सेलूकाटे येथे महाराष्ट्र शासनाच्या व्हिजन ३०० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत आयोजित वन महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी १० वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११:३० वाजता दैनिक देशोन्नती कार्यालय केळकरवाडी आर्वी रोड वर्धा येथे दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त व्हिजन २०२६ विशेषांकाचे प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहतील. 

१२:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अमृत महोत्सव संदर्भात तसेच इतर शासकीय विभागांच्या आयोजित केलेल्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. सायंकाळी ६ वाजता वर्धा येथून हिंगणघाट कडे प्रयाण करतील. सायंकाळी सात वाजता हिंगणघाट येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील व सोयीनुसार हिंगणघाट येथून वर्धा येथे आगमन व राखीव.





  Print






News - Wardha




Related Photos