महत्वाच्या बातम्या

 वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजपूत समाजाच्या कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : क्षत्रिय राजपूत समाज संघटना, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जयंती समारोह कार्यक्रमास गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमादरम्यान आमदार डॉ. नरोटे यांनी राजपूत समाजातील बांधवांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रश्नांची माहिती जाणून घेतली. समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारून संबंधित विषयांवर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमास ठा. अरुणसिंह नत्थुसिंह पवार, ठा. रूपेंद्रसिंह इंद्रपालसिंह गौर, ठा. मनोजसिंह रणजीतसिंह पवार, ठा. रणजीतसिंह नंदुसिंह रघुवंशी, ठा. अजयसिंह बडगुजर, ठा. राजेशसिंह आनंदसिंह बैस यांच्यासह राजपूत समाजातील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि त्याग हे आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आदर्शांचा वारसा जपत समाजहित आणि जनकल्याणासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos