ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये धान खरेदीकरीता शासनाचे BEAM पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकरी नोंदणी करण्याची मुदत १ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंत करावयाची होती. परंतू आता शासनाकडून ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्याकरिता १५ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी उपस्थित राहणेसह, चालू हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना ८ अ, अद्ययावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्ययावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून तालुक्यातील जवळच्या पणन महासंघाच्या अ वर्ग व ब वर्ग सभासद संस्था असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी पूर्ण करावी व शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार व जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




