महत्वाच्या बातम्या

 घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात ०९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालती चे आयोजन


- तडजोडीने वाद मिटविण्याचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश प्रविण पाटील यांचे आवाहन

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
अयनुद्दीन सोलन्की / घाटंजी : दिवाणी व फौजदारी न्यायालय, घाटंजी आणि तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शनिवार, ०९ मे २०२६ रोजी घाटन्जी येथील न्यायालयाच्या परिसरात राष्ट्रीय लोक अदालती चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीचे उदघाट्न दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदन्डाधीकारी प्रविण पाटील यान्च्या हस्ते होणार आहे. 

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणे आपापसातील तडजोडीने निकाली काढण्याची संधी पक्षकारांना मिळणार आहे.

या प्रकरणांचा होणार निपटारा -
या लोक अदालतीमध्ये प्रामुख्याने दिवाणी प्रकरणे, फौजदारी स्वरूपाचे तडजोडपात्र खटले, कौटुंबिक वाद, बँक कर्ज वसुली प्रकरणे, वीज व पाणी देयके विषयक वाद, आणि कामगार वाद यांसारख्या प्रकरणांवर सुनावणी होऊन ती सामोपचाराने सोडवली जातील.

लोक अदालतीचे फायदे  -
वेळ आणि पैशांची बचत: येथे प्रकरणांचा निपटारा त्वरित होत असल्याने पक्षकारांचा वेळ आणि कोर्टाच्या फेऱ्यांचा खर्च वाचतो.

कायमस्वरूपी निकाल: लोक अदालतीतील निवाडा हा दोन्ही पक्षांच्या संमतीने होत असल्याने तो अंतिम असतो आणि त्याविरुद्ध अपील करता येत नाही.

सलोखा कायम राहतो: कोर्टातील वादावादीपेक्षा सामोपचाराने तोडगा निघाल्याने दोन्ही पक्षांमधील नाते आणि सामाजिक सलोखा टिकून राहतो.

कोर्ट फी परतावा: न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात तडजोड झाल्यास नियमानुसार भरलेली कोर्ट फी परत मिळण्याची तरतूद आहे.

प्रशासनाचे आवाहन -
न्याय सर्वांसाठी - जलद, सोपा आणि सुलभ या ब्रीदवाक्याला अनुसरून जास्तीत जास्त पक्षकारांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांत तडजोड करून या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन घाटंजी न्यायालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन घाटन्जी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदन्डाधीकारी प्रविण पाटील यांनी केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos