सानगडीजवळ भरधाव कारच्या धडकेत महिला गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / साकोली : तालुक्यातील सानगडी पेट्रोल पंपाजवळ २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८:४५ वाजताच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात गोंदिया जिल्ह्यातील सिलेझरी येथील गीता रविंद्र ब्राम्हणकर (वय ५७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र ब्राम्हणकर हे आपल्या पत्नीसह मोटारसायकल (एमएच ३६ एएफ २५३७) ने सिलेझरीकडून साकोलीकडे जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने (एमएच ४० केआर ११७४) निष्काळजीपणे ओव्हरटेक करत मोटारसायकलला कट मारला. अचानक झालेल्या या धडकेमुळे मोटारसायकलचा ताबा सुटून दोघेही रस्त्यावर कोसळले.
या अपघातात गीता ब्राम्हणकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर त्यांच्या पतीला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. संबंधित वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




