आरोग्य सेवेचा नवा अध्याय : सेमाना येथे अत्याधुनिक ICU रुग्णवाहिका जनसेवेत समर्पित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य सेवेला अधिक बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आज गाठण्यात आला. सेमाना येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा प्रकल्पांतर्गत आणि Research Organization for Living Enhancement (ROLE) यांच्या वतीने दोन अत्याधुनिक ICU रुग्णवाहिकांचे लोकार्पण गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात हलवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत या अत्याधुनिक रुग्णवाहिका फिरते रुग्णालय म्हणून कार्य करणार आहेत. व्हेंटिलेटर, कार्डियाक मॉनिटर तसेच अत्याधुनिक लाइफ सपोर्ट प्रणालींनी सुसज्ज असलेल्या या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना प्रवासादरम्यानच तातडीचे उपचार मिळणार असून, त्यामुळे जीव वाचविण्यात मोठी मदत होणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील विकासाला निश्चितच गती मिळणार असल्याचे यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले.
या प्रसंगी कोषाध्यक्ष हेमंतजी राठी, सदस्य कृष्णाजी रेड्डी, डॉ. सुनीलजी मडावी, जनजाति विकास समिती गडचिरोलीचे सचिव विकासजी वडेट्टीवार, पाणीपुरवठा सभापती लिलाधारजी भरडकर, सदस्य सौरभजी पुण्यापरेडीवार,अंकुशजी गोंड्रालवर, संतोषजी बोलुवार, सौरभजी पुनप्रेद्दीवार तसेच विक्कीजी कागदेलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, ही सेवा जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




