आजचे दिनविशेष


२९ नोव्हेंबर महत्वाच्या घटना
१८७७ : थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
१९४५ : युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.
१९६३ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.
१९७२ : अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.
१९९६ : नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
२००० : शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
२००० : दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
२९ नोव्हेंबर जन्म
१८०३ : ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्चीयन डॉपलर यांचा जन्म.
१८४९ : ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग यांचा जन्म.
१८६९ : समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९५१)
१८७४ : नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.
१९०७ : प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २०००)
१९०८ : तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.
१९१९ : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१३)
१९२० : स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०१४)
१९२६ : लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६)
१९३२ : फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती जाक्स शिराक यांचा जन्म.
१९६३ : भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.
१९७७ : पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म.
१९७६ : अमेरिकन अभिनेते चाडविक बॉसमन यांचा जन्म (मृत्यू : २८ ऑगस्ट २०२०)
१९२९ : भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन यांचा जन्म (मृत्यू : २९ जुलै २०१३)
१९१५ : रिमोट कंट्रोलचे शोधक यूजीन पॉली यांचा जन्म (मृत्यू : २० मे २०१२)
१८७६ : अमेरिकेच्या गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला नेली टेलो रॉस यांचा जन्म (मृत्यू : १९ डिसेंबर १९७७)
२९ नोव्हेंबर मृत्यू
१९२६ : ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.
१९३९ : मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९४)
१९५० : महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.
१९५९ : मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६५)
१९९३ : जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)
२००१ : बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)
२०११ : आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.
१६३२ : बोहेमियन राजा फ्रेडरिक व्ही, इलेक्टर पॅलाटिन यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १५९६)
News - todayspecialdays




Petrol Price




