महत्वाच्या बातम्या

 बोरीसिंह येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या


- झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाचा खुन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घाटजी : वडगाव जंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बोरीसिंह येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून एका युवकाचा खून करण्यात आला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार २८ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत २२ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खुन करण्यात आला.

पोलीस सुत्रानुसार, मयत आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय २२) याचे आरोपी पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय ४०) यांच्या पत्नीसोबत मागील वर्ष भरापासून अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून संतप्त झालेल्या आरोपीने सदर युवकावर जीवघेणा हल्ला केला.

घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास मृतक आशिष घराच्या छतावर झोपलेला असताना आरोपीने कुऱ्हाडीने गळ्यावर, पाठीवर आणि हातावर सपासप वार करत त्याची निर्दयी हत्या केली. या आधी आरोपीने चुकीच्या समजुतीतून आशिष ऐवजी त्याचा मोठा भाऊ शरद खंडूजी कांबळे (वय २९) याच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला होता. या हल्ल्यात शरद जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राहुल गुंठे यांनी तात्काळ वडगाव जंगल पोलिसांना कळविले. त्यावरुन ठाणेदार विकास दांडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सशयित आरोपी पांडुरंग कांबळे याला तात्काळ अटक केली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





  Print






News - Rajy




Related Photos