आजचे दिनविशेष


२४ एप्रिल महत्वाच्या घटना
१६७४ : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
१७१७ : खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
१८०० : जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.
१९६७ : वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.
१९६८ : मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.
१९७० : गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
१९९० : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
१९९३ : इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.
२०१३ : ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.
२४ एप्रिल जन्म
१८८९ : इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)
१८९६ : रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)
१९१० : चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)
१९२९ : कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)
१९४२ : अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.
१९७० : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
१९७३ : भारतीय क्रिकेटपटू - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार, महाराष्ट्र भूषण सचिन तेंडुलकर यांचा जन्म
१९९३ : ७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
१९४२ : माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष जॉर्ज वेला यांचा जन्म
१९३४ : भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचा जन्म (मृत्यू : ८ एप्रिल २०१५)
१९३४ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते एडिडा नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर २०१५)
१८२३ : मेक्सिको देशाचे अध्यक्ष सेबॅस्टियन लेर्डो डी तेजाडा यांचे जन्म (मृत्यू : २१ एप्रिल १८८९)
२४ एप्रिल मृत्यू
१९४२ : नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९००)
१९६० : नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.
१९७२ : चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)
१९७४ : देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)
१९९४ : उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)
१९९९ : चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.
२०११ : आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
२०१४ : भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)
२००७ : अमेरिकन उद्योगपती, एव्हिस रेंट अ कार सिस्टमचे संस्थापक वॉरन एव्हिस यांचे निधन (जन्म: ४ ऑगस्ट १९१५)
News - todayspecialdays




Petrol Price




