वर्धा तालुक्यात बसस्थानकाजवळ मालवाहु वाहनाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) येथील बसस्थानकासमोर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धक्कादायक अपघात घडला. एम. एच. ३२ ए. जे. ४४६५ क्रमांकाच्या मालवाहु वाहनाने अरुण मोतिराम भावरकर (वय ५५, रा. आंजी) यांना धडक दिली. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृतक अरुण भावरकर हे पतसंस्थेचे डेली वसुली एजंट म्हणून काम करत होते. त्याच कामाकरिता ते त्या ठिकाणी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याचे समोर आले.
वाहनाचे चालक जाफर खान हसर खान (रा. वर्धा) असल्याचे माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला असून, अपघाताची नोंद घेऊन पुढील कारवाईसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.
स्थानिकांनी रस्त्यावर वाहन चालवताना नियम पाळण्याची आणि पादचारी सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली आहे, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर मिळाली.
News - Wardha




Petrol Price




