महत्वाच्या बातम्या

 महाविद्यालयांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर करावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच शासकीय नोकरी करीता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना ११ व १२ वी विज्ञान शाखेत असतांनाच वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी शासन उपक्रम राबवित आहे. राज्यातील ११ व १२ वी विज्ञान शाखेचा एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाण पत्रापासून वंचीत राहु नये, असे समाज कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांनी सुचित केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या १२ वी मधील जवळपास ७ हजार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले असून, १ जानेवारी २०२३ पासून ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशित विज्ञान शाखेच्या ११ वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांकडून भरुन घ्यावे व सदरील अर्जाच्या छापील प्रती/प्रिंट आऊट प्रत्यक्ष एकत्रितरित्या महाविद्यालयामार्फत या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos