साकोली पोलिसांची ७५ गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / साकोली : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी साकोली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. अवैध दारूविक्री आणि संभाव्य तंटे टाळण्यासाठी ७५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार कारवाई करण्यात आली आहे.
साकोली पोलिस स्टेशनकडून उपविभागीय अधिकारी, साकोली यांच्याकडे याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार, संबंधित गुन्हेगारांना १३ ते १५ एप्रिल दरम्यान तालुक्यात प्रवेशबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही कारवाई स्थानिक शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. स्थानिक प्रशासन सतत गुन्हेगारीवर लक्ष ठेवून कठोर पावले उचलत आहे.
News - Bhandara




Petrol Price




