महत्वाच्या बातम्या

 महिला लोकशाही दिन १६ मार्च रोजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : समस्याग्रस्त व पिडीत महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलबध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून राज्य, विभाग व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महिला लोकशाही दिनामध्ये पिडीत महिलांच्या तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. महिलांनी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसणारे अर्ज, न्यायप्रविष्ठ, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही. जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या व तालुकास्तरावर चौथ्या सोमवारला महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न सोडविण्याचे  दृष्टीने शासनाने एक व्यासपीठ निर्माण केले असुन महिला लोकशाही दिनाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos