महत्वाच्या बातम्या

 गायी-म्हशींना पाणी पाजताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोहलगाव येथे गायी-म्हशींना पाणी पाजताना तलावातील पाण्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी ७ दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचे नाव विलास शंकर सोनवाने (२३, रा. कोहलगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास सोनवाने शनिवारी दुपारी आपल्या गायी-म्हशींना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावावर गेला होता. जनावरांना पाणी पाजल्यानंतर तो तलावातून बाहेर येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अचानक खोल पाण्यात गेला. त्यामुळे तो पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.

काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शोध घेतला. मात्र तोपर्यंत विलास सोनवाने याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली.

याप्रकरणी फिर्यादी किसन सीताराम मुनेश्वर ५०, रा. कोहलगाव यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार प्रशांत बोरकर करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos