महत्वाच्या बातम्या

 धुलीवंदनाच्या दिवशी जिल्ह्यात दारूची दुकाने बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात ३ मार्च २०२६ रोजी धुलीवंदन उत्सव मोठया प्रमाणात साजरा होत असल्याने या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने किरकोळ देशी आणि विदेशी मद्य विकीची दुकाने (अनुज्ञप्त्या) बंद ठेवण्यात येणार आहे. नागपूर जिल्हयात या सणाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हयातील मदय विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहे.

३ मार्च २०२६ रोजी धुलीवंदन उत्सव-२०२६ या सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयातील सर्व मंजूर व कार्यान्वीत असलेल्या नमुना-ई, नमुना-ई-२, एफएलडब्लु-२. सीएल-२, सीएल-३, एफएल-१, एफएल-२, सीएलएफएलटिओडी-३, एफएल-३, एफएल-४(अे), एफएलबीआर-२, व टिडी-१ हया अनुज्ञप्त्या संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेशीत करण्यात आले आहे. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाचा भंग करतील त्यांच्याविरूध्द नियमानुसार सक्तीची कार्यवाही करण्यात येईल, याची त्यांनी नोंद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos