कोहमारा चिखली मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तीन जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : कोहमारा चिखली मार्गावर गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये सुधाकर टेकाम (५५) आणि त्यांची पत्नी शितल टेकाम (४५), रा. रेंगेपार दल्ली यांचा समावेश आहे, तर तिसऱ्या जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, सुधाकर टेकाम आणि शितल टेकाम आपल्या दुचाकी (क्र. एमएच ३५ डब्ल्यू ९४५७) वर चिखलीकडून कोहमाराकडे जात होते. त्याचवेळी, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी (क्र. एमएच ३५ एसी ६८८३) ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही दुचाकीस्वार खाली पडले आणि गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना गोंदिया रुग्णालयात रेफर करण्यात आले.
पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून, यामुळे चिखली-कोहमारा मार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपायांची आवश्यकता अधिक जाणवली आहे.
News - Gondia




Petrol Price




