बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

- आर्वी, वर्धा व सेलू तालुक्यात गॅन्ट्रीचे काम
- प्रत्येकी एक तास वाहिनी पुर्णपणे बंद राहणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर व वर्धा जिल्ह्यात ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम १४ टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या ठिकाणी काही कालावधीसाठी रस्ता बंद राहणार आहे. मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका व वर्धा जिल्ह्यातील सेलू, आर्वी व वर्धा तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी ०+००० ते कि.मी ८९+४१३ दरम्यान समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या टप्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतुक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीकरिता पुर्णत: थांबविण्यात येणार आहे.
३१ जानेवारी रोजी महामार्गावर वर्धा तालुक्यात नागपूर वाहिनीवर साखळी क्रमांक ५८.९ व ५९.५ वर दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास तसेच याच वाहिनीवर साखळी क्रमांक ६५.४ वर दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहील.
१ फेब्रुवारी रोजी सेलू तालुक्यात नागपूर वाहिनीवर साखळी क्रमांक ३१.५ व ३७.७ वर दुपारी ३ ते ४ वाजता तसेच मुंबई वाहिनीवर ३७.७ व ४५.४ वर दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहील.
२ फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक ८.६, ९.५ व ९ वर दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहील. तसेच याच तालुक्यात नागपूर वाहिनीवर साखळी क्रमांक ८.६, ९.५ व ९ वर दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहील.
३ फेब्रुवारी रोजी आर्वी तालुक्यात मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक ८४.४ वर दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ब्लॉक राहणार आहे.
यादरम्यान सदर भागात वाहतूक ४५ ते ६० मिनीटाच्या कालावधीसाठी पुर्णत: थांबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन या दिवशी प्रवास करणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




