महत्वाच्या बातम्या

 बारामती येथे विमान अपघात : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू


- मुंबईहून आलेले विमान लँडिंगदरम्यान शेतात कोसळले

- डीजीसीएची माहिती, घटनास्थळी धुराचे लोट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून बारामतीकडे येणारे हे विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले.

या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून, या घटनेत दोन्ही वैमानिकांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले असून, विमान उतरत असताना शेतात कोसळल्याचे दृश्य त्यात दिसत आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी सहा जण प्रवास करत होते. अपघातानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातामुळे राज्याच्या राजकारणात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos