रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम बनगाव येथील रहिवासी संतोष विठोबा पाऊलझगडे (वय ५०) यांचा रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना ११ जानेवारी रोजी घडली होती.
प्राप्त माहितीनुसार, संतोष पाऊलझगडे हे रेल्वेने प्रवास करीत असताना तोल जाऊन रेल्वेतून खाली पडले, यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचार सुरू असतानाच गुरुवारी (१५) सकाळी ६.४९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे पाऊलझगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
News - Gondia




Petrol Price




