गोंदिया : तिरोडा पोलिसांची मोठी कारवाई, अवैध रेती वाहतूक जप्त


- १४ ब्रास रेती आणि टिप्पर जप्त, मालाची किंमत ४० लाख ४८ हजार रुपये
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तिरोडा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परमधून १४ ब्रास रेती जप्त केली. ही कारवाई १२ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घोगरा ते एलोरा रस्त्यावर करण्यात आली. वाहतुकीसाठी कोणताही अधिकृत परवाना न मिळाल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई केली.
या प्रकरणात टिप्पर क्रमांक एमएच ४०, सीझेड-१८१९ चा चालक रोशन शंकर शंकपाल (२६, खैरी, ता. तिरोडा) आणि टिप्पर मालक राकेश भेलावे (२६, घोगरा, ता. तिरोडा) तसेच दुसऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४०, सीताय १८१९ चा चालक रोहित राजकुमार बांडेबुचे (२३, मोहाडी, जि. भंडारा) आणि टिप्पर मालक विनोद सोनटक्के (३०, खापा, ता. तुमसर, जि. भंडारा) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या १४ ब्रास रेतीची एकूण किंमत ८४ हजार रुपये आहे. तसेच, टिप्परची किंमत प्रत्येकी २० लाख रुपये असल्यामुळे एकूण जप्त मालाची किंमत ४० लाख ४८ हजार रुपये आहे. तपासाच्या आधारे, या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३०५ (ई) आणि ४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आले असून, सहायक पोलिस निरीक्षक बहस पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर आळा घालून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दिशेने महत्वाची पाऊलं उचलली आहेत.
News - Gondia




Petrol Price




