महत्वाच्या बातम्या

 वसमत तालुक्यात भूकंपाचे वारंवार धक्के : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला नुकतेच भूकंपाचे वारंवार बसणारे धक्के नागरिकांमध्ये चिंता आणि घबराट निर्माण करणारे ठरले आहेत. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी वसमत तालुक्यातील कुपटी येथे भूगर्भातून मोठा आवाज ऐकू आला, आणि जमिनीला मोठा धक्का बसला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

सकाळच्या वेळी भूगर्भातून अचानक मोठा आवाज आणि जमीन हादरली, ज्यामुळे काही क्षणांसाठी नागरिकांना काय घडले हे कळालेच नाही. नंतर भूकंपाचा धक्का असल्याचे स्पष्ट झाल्यावर कुपटी गावातील लोक मोठ्या संख्येने एकत्र आले. या धक्क्यापूर्वी, अवघ्या दोन दिवसांपूर्वी पांगरा शिंदे आणि आसपासच्या परिसराला सलग तीन भूकंपाचे धक्के बसले होते, ज्यामुळे गावातील नागरिक आधीच चिंतेत होते.

वद्याच्या धक्क्याने केवळ कुपटी गावापुरता सीमित नसून, पांगरा शिंदे, वापटी, शिरळी आणि आसपासच्या इतर गावांनाही तो अनुभव आला. मागील काही वर्षांपासून वसमत तालुक्यात वारंवार भूकंपाचे धक्के आणि भूगर्भातून अज्ञात आवाज ऐकू येत आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाने भूगर्भातील सूक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचा प्रश्न आहे की, या भूकंपांच्या घटनांमुळे काही मोठे संकट येणार का?





  Print






News - Rajy




Related Photos