महत्वाच्या बातम्या

 रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  गोंदिया :  तिरोडा-गोंदिया मार्गावरील भाजी बाजारासमोर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २२) रात्री घडली. मृताचे नाव धर्मेंद्र कुंडलिक उदापुरे (४८, रा. मेंढा, तिरोडा) असे आहे.

फिर्यादी चंद्रसेन नामाजी उदापुरे (६५, रा. भेडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान ते आणि त्यांचा पुतण्या धर्मेंद्र उदापुरे हे तिरोडा येथील भाजी बाजार परिसरातून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी अज्ञात चारचाकी वाहनचालकाने अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून धर्मेंद्र यांना जोरदार धडक दिली व वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

धक्क्याची तीव्रता इतकी होती की धर्मेंद्र उदापुरे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. अज्ञात वाहनचालकाविरोधात तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos