दिशा पटानीच्या घरावरील गोळीबारात आरोपींवर पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / लखनौ : अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील वडिलोपार्जित घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हल्लेखोरावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षेला बाधा आणणारा प्रत्येक गुन्हेगार मारीच राक्षसासारखा छद्मवेश धारण करून आला, तरी त्याचा खात्मा होईल किंवा त्याला राज्य सोडावे लागेल, असे ते म्हणाले.
शनिवारी लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात योगींनी गोळीबार प्रकरणातील आरोपींवर भाष्य केले. काल तुम्ही पाहिले की राज्याबाहेरून आलेला एक गुन्हेगार महिलांच्या विरोधात गुन्ह्यात सहभागी होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला चकमकीत पकडले. तो पोलिसांसमोर हात जोडून म्हणत होता की चुकून उत्तर प्रदेशात आला आणि पुन्हा कधीही येथे येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बरेली पोलिसांनी कारवाई करतदोन आरोपींना चकमकीत ठार केले असून, आरोपी रामनिवास व अनिलला अटक करण्यात आली आहे. या चकमकीत रामनिवासच्या पायाला गोळी लागली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो पोलिसांसमोर दया मागताना दिसत आहे.
१२ सप्टेंबरच्या पहाटे ३:४५ वाजता झालेल्या हल्ल्यात पटानींच्या घरावर तब्बल नऊ राउंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अभिनेत्रीच्या बहिणी खुशबू पटानीने धार्मिक नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याची कबुली टोळीने सोशल मीडियावर दिली होती.
News - World




Petrol Price




