महत्वाच्या बातम्या

 अर्धांगवायूग्रस्त अशोक मांडवगडे यांना हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांची आर्थिक मदत


- कुटुंबीयांची भेट घेत दिला धीर; पुढील उपचारासाठीही मदतीचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथील इंदिरा गांधी कॉलनी (बेघर कॉलनी) परिसरातील रहिवासी अशोक मांडवगडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष असलेल्या अशोक मांडवगडे यांच्यावर अचानक ओढवलेल्या या संकटामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. दरम्यान, अशोक मांडवगडे यांच्या आजारपणाची व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांना मिळताच त्यांनी रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी बेघर कॉलनी येथे जाऊन मांडवगडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत त्यांना आर्थिक मदत केली. तसेच अशोक मांडवगडे यांच्या पुढील उपचारासाठीही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

अचानक आलेल्या संकटामुळे खचलेल्या मांडवगडे कुटुंबीयांना हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या काळात प्रत्यक्ष भेट देऊन आर्थिक मदतीसोबतच कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने परिसरात त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

यावेळी हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र भाऊ अलोणे, रोशन सैय्यद, सलीम भाई शेख, प्रकाश मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संकटाच्या काळात गरजू कुटुंबाला मदतीचा हात देत त्यांना मानसिक आधार देण्याचे काम हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी केले असून, त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





  Print






Related Photos