स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेटचा चांगला उपयोग होईल - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


- महाज्योतीच्यावतीने विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सोशल मीडियायाच्या काळात स्पर्धेत टीकून राहणे फार महत्वाचे आहे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना स्पर्धेत टाकण्यासोबतच आपले करीअर करण्याची उत्तम संधी टॅबलेटच्या माध्यमातून मिळणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यालतीने (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जेईई, नीट, एमएचटी सीइटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमचे वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष गवई, महाज्योतीचे दिपेंद्र मोदी, अनिकेम चौधरी आदी उपस्थित होते.
क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड विरोध झुगारुन वंचित, गरीब, मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांच्या विचारातला समाज निर्माण करण्यासाठी शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे. संस्थेच्यावतीने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी निर्माण करुन देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर पुढे बोलतांना म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपले करीअर करतांना ताण तणावात न राहता महाज्योतीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन करीअर करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
प्रास्ताविक करतांना संतोष गवई म्हणाले, महाज्योतीच्यावतीने जिल्ह्यातील १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व ११ वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या जेईई, नीट, एमएचटी सीईटी या परीक्षांचा अभ्यास करणा-या जिल्ह्यातील ६१ विद्यार्थ्यांना टॅबलेट व ६ जीबी प्रति दिवस डाटा असलेले सीमचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगून या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




