कोरोनामुक्त असलेल्या गोंदियात आज एकाच दिवशी आढळले २० कोरोना रुग्ण, कोरोना रुग्णांची संख्या पोहचली २२ वर


- पाॅझिटिव्ह रेडझोनमध्ये जिल्ह्याचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील एका तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचाराअंती त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठविण्यात आले. गेल्या ३८ दिवसांपासून गोंदिया कोरोनामुक्त होता. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु मंगळवार, १९ मे रोजी ३९ व्या दिवशी २ तर आज गुरुवारला (दि. २१) एकासोबत २० नवे रुग्ण आढळल्याने जिल्हा रेडझोनमध्ये गेला आहे. गोंदिया जिल्ह्यात एकुण २२ रुग्ण सध्या पाॅझिटिव्ह असून १ निगेटिव्ह आहे. आज पाॅझिटिव्ह आलेले बहुतांश रुग्ण हे मुंबई, पुणे येथून आलेले आहेत. यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील ५, अर्जुनी मोरगाव व गोंदिया तालुक्यातील रुग्णांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
  Print


News - Gondia | Posted : 2020-05-21


Related Photos