भामरागड येथे सिकलसेल आजार जनजागृतीचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : आज मल्टी ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट मस्टर एरीया बिना गोंडा स्थित भामरागड या स्वयंसेवी सामाजिक संस्थेद्वारा सिकलसेल सप्ताह ११ डिसेंबर ते 17 डिसेंबर निमित्ताने भामरागड येथे सिकलसेल आजार जनजागृती चे आयोजन करण्यात आले. रॅलीत आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहातील लाभार्थी लाभार्थीने त्याचप्रमाणे भावनगर येथील नागरिक जगदीश दुर्गे यांनी सहभाग घेतला. रॅलीचे नेतृत्व रूपकला गवगले यांनी केले. आदिवासी मुलांचे वस्तीगृहापासून रॅलीची सुरुवात करून भामरागड येथील मुख्य रस्त्याने रॅली फिरवून साज मल्टी ऍक्टिव्हिटी संस्थेच्या निर्माण कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. सिकलसेल आजार जनजागृती करताना चला जाऊ या सिकलसेल तपासणीला, लग्नाआधी सिकलसेलची तपासणी करा, ज्याच जळे, त्याला कडे अशा घोषवाक्य बोलून जनजागृती करण्यात आली.
सिकलसेल आजार मार्गदर्शन व तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी.एम. सातमवार, लॅब टेक्निशियन रणदीप दुधे उपस्थित होते. डॉ. बी एम सातमवार यांनी सिकलसेल आजार, सिकलसेलचे प्रकार त्यावर उपाय व सिकलसेल ss रुग्णांनी घ्यावयाची काळजी यावर वैद्यकीय मार्गदर्शन केले.
सिकलसेल आजार नमुने तपासणी शिबिरात एकूण 48 सोलुबिलिटी टेस्ट घेण्यात आल्या. त्यातील महिला पुरुषांचे नुकतेच रक्ताचे आठ नमुने इलेटोपोर्सेस करिता ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे जमा करण्यात आले. अंतिम तपासणी करिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे १२ डिसेंबर ला पाठवण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कार्तिक मडावी, सरजू आलाम, ऋषी पल्लो, बालाजी कुरसामी, प्रकाश उसेंडी, जगदीश दुर्गे यांनी परिश्रम घेतले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड व ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील अधिकारी कर्मचारी यांचे विशेष आजार कार्यक्रमाचे आयोजक कुमार रूपलाल गोंगले यांनी मानले.
News - Gadchiroli