पोल्ट्री फार्मच्या वादात रामकृष्णपूर येथील सहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
चामोर्शी तालुक्यातील रामकृष्णपूर येथे पोलीस पाटील प्रतिभा मंगल मिस्त्री यांच्या घराजवळील परिसरात पोल्ट्री फार्म तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे सदर पोल्ट्री फार्म तत्काळ काढण्यात यावे याबाबतचा अर्ज गावातील १४ नागरिकांनी आष्टी पोलीस स्टेशनला दिल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस हवालदार रामटेके व चालक ४ एप्रिल २०२० ला रामकृष्णपूर येथे जाऊन सदर घटनेची चौकशी करून पोलीस पाटील प्रतिभा मंगल मैत्री यांना सदर पोल्ट्री फार्म तत्काळ हटविण्याबाबतच्या सूचना देऊन आष्टीला परत येण्यास निघाले. दरम्यान, पोलीस रायपूर येथे पोहताच पोलीस पाटील प्रतिभा मंगल मिस्त्री यांनी पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील यांना फोन करून तुम्ही चौकशी करून गावाबाहेर जाताच दहा ते बारा इसम मला व माझ्या मुलांना मारहाण केली असे सांगितले. त्यामुळे सदर वादाचे स्वरूप गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात रूपांतर होऊ नये म्हणून मारहाण करणाऱ्या इसमांना चौकशी करण्याकरिता ताब्यात घेण्यास पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील हे दहा पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन रामकृष्णपूर येथे गावात जाऊन दीपक सरकार, विपुल सरकार यांना त्यांच्या घरून ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व कर्मचारी कर्मचारी दिलीप दास यांच्या मुलास ताब्यात घेण्याकरिता त्यांच्या घरी गेले असता दिलीप दास यांनी पोलिसांसोबत वाद घालून तुम्ही वारंट आणले आहे का ? असे हुज्जत घालून नकार दिल्यानंतर दिलीप दास व त्यांचा मुलगा भगीरथ दास यांना सोबत घेऊन गावातील रस्त्याने जात असताना जिल्हा परिषद शाळेच्या समोर गेल्यावर दिलीप दास, भगीरथ दास, दीपक सरकार, विपुल सरकार, आशु सरकार, तुषार मिस्त्री व गावातील इतर इसमांना एकत्र करून पोलिसांना प्रतिबंध करून महाराष्ट्र शासनाच्या कोरोनासंबंधी आदेशाचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून यातील सहा आरोपिंविरुद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे कलम ३५३, ३४१, १४३, १४७, १४९, १७८, २६९, २७९, २९० अन्वये गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यांमध्ये काही व्हिडिओ चित्रीकरण प्राप्त केले आहे व नजीकच्या काळात सदर गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रजनिष निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मेंद्र मडावी हे करीत आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-08


Related Photos